Life of Stories

Anuradha, Shaila, Aarti, Madhavi, Jayashree, Asavari, Ranjana & More

Join various authors in engaging readings of stories both popular and unique. This podcast offers a multilingual auditory tour through the world of imagination and wonder. Stories are grounded in Science, History, Fiction, Non-Fiction and more.

read less
Kids & FamilyKids & Family

Episodes

# 1638:  त्यांच्या मनात मी जिवंत असेन..! ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
Dec 25 2024
# 1638: त्यांच्या मनात मी जिवंत असेन..! ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
Send us a textखूप दिवसातून मी त्यांना भेटत होतो.... मला बघितल्यावर मग, हात वारे करून माझ्याशी त्या हक्काने कचकचून भांडायला लागल्या...! "आमी काय मरायचं का ? तू काय सोताच्या मनाचा मालक हाय का ? तुला काय लाज हाय का ?" वगैरे वगैरे...शंभर गोष्टी त्यांनी मला सुनावल्या... ! "माझा डावा हात अजूनही नीट उचलत नाही.... तरीही मी मोटरसायकल चालवत गेलो होतो.... ! उजवा हात माझ्या डाव्या छातीवर ठेवून, अभिवादन करून, मी त्यांना समजेल अशा भाषेत सांगितलं, 'माज्या मानंच्या मणक्यामदल्या शिरा चीमटल्या हायेत... माजा डावा हात नीट काम करत न्हायी... तरीबी तुमच्यासाठी गाडी चालवून हितपर्यंत आलो... फकस्त तुमच्यासाटी... ! आणि तुमि माज्याशी भांडायला लागला..." मी काकुळतीने बोललो... ! ही वस्तुस्थिती ऐकल्यानंतर त्यांचा चेहरा मात्र लगेच बदलला...
# 1633:  रद्दीवाला. लेखक कौस्तुभ केळकर नगरवाला. कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
Dec 15 2024
# 1633: रद्दीवाला. लेखक कौस्तुभ केळकर नगरवाला. कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
Send us a text रघू तसा बुद्धीनं यथातथाच. पण धंद्यात डोकं भारी चालायचं. कुठली रद्दी आहे, कुठल्या रद्दीला सेकंडमधे सोन्याचा भाव आहे, हे त्याला बरोबर कळायचं. कसाबसा बारावीपर्यंत शिकला. आन् धंद्याला लागला.वर्षभरात गणूकाका गेले,  अन् रघूचा रघूशेट झाला. तसाच हसमुखराय चेहरा. गोडबोल्या स्वभाव. ईलेट्राॅनिक काट्यावर अचूक वजन करायचा. चोख भाव. हिशोबाला पक्का. दुकानाबाहेर वाचणेबल पुस्तकं , मासिकांचं प्रदर्शन. रद्दीवालं गिर्हाईक बाहेर घुटमळायचंच. जाताना एखादं पुस्तक घेऊन जायचंच जायचं. रद्दी टाकायला मी अजूनही लकडी पुलावर जातो. माझ्या आवडत्या खुर्चीवर बसून पुस्तकं चाळतो. फोटोतल्या गणूकाकांना भेटतो. मजा येते.