Ep-02. Rahul Gandhi चं सदस्यत्व रद्द होणं भाजपसाठी घोडचूक ठरेल? विषय खोल पृथ्वी गोल | Modi Defamation Case

विषय खोल पृथ्वी गोल - Vishay Khol Pruthvi Gol

Apr 24 2023 • 8 mins

#defamationtrial #rahulgandhi #rahulgandhiconvicted #narendramodi #bjp #inc #congress यापूर्वीही राजकारणात राजीव गांधी, अटल बिहारी वाजपेयी, मनमोहन सिंग यांना चोर म्हटलं गेलं आहे. मग राहुल गांधीच का? पुढच्या वर्षी लोकसभेची निवडणूक आहे, त्यात राहुल गांधींची भारत जोडो यात्रा अजून ताजी आहे आणि गरमागरम म्हणजे त्यांनी परदेशात जाऊन सध्याच्या सरकारवर केलेली जागतिक मंचावरची टीका. खासकरून राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला तरुणांचा मिळालेला प्रतिसाद आणि आगामी निवडणुकांना असलेला अवधि यात राहुल गांधींना अजून मतदार आपल्याकडे खेचण्याची संधी भाजपला त्यांना मिळू द्यायची नसेल. निवडणुका जसजशा जवळ येतील तसे सरकार विरोधकांना घेरण्याचा प्रयत्न करेल. यात भाजपचा किंवा कॉँग्रेसचा काय फायदा आणि तोटा? एकंदरीत २०१४ पासून राहुल गांधी यांना भाजपने पप्पू म्हणून लोकांसमोर उभारलेली प्रतिमा राहुल गांधी यांनी मागील काही वर्षांत काही अंशी नक्कीच खोडून काढली आहे. त्यात त्यांना भारत जोडो यात्रेने बळ मिळवून दिले आहे हे भाजप नाकारू शकत नाही. शिवाय त्यांनी केंब्रिज सारख्या प्रतिष्ठित विद्यापीठात जाऊन जागतिक मंचावर जाऊन नुकतंच दिलेलं लेक्चर असो. सध्या भाजप जरी नाकारत असले तरी थोडी का होईना भाजपला राहुल गांधींची धास्ती असेलच. मानहाणीच्या या निकालाचा पहिला फायदा भाजपला तेव्हा झाला जेव्हा राहुल गांधींना शिक्षा झाली आणि पाठोपाठ दूसरा फायदा त्यांची खासदारकी रद्द होऊन झाला. असं आत्ता तरी दिसतंय.