Ep 01. तुमचं जुनं सोनं HUID Hallmark करून घेतलंय का? विषय खोल पृथ्वी गोल| BIS care | Gold Hallmarking

विषय खोल पृथ्वी गोल - Vishay Khol Pruthvi Gol

Apr 19 2023 • 4 mins

#huid #biscareapp #hallmark #gold #goldstandard #india #modi दिनांक १ एप्रिल २०२३. पासून सोन्याच्या प्रत्येक दगिन्यांवर HUID बंधनकारक असणार आहे. याचाच अर्थ असा की १ एप्रिलपासून HUID क्रमांकाशिवाय सोन्याच्या दागिन्यांना विक्रीस परवानगी दिली जाणार नाही. हॉलमार्क, हे जगभरातल्या खूप साऱ्या देशांत मौल्यवान धातूंच्या शुद्धतेचे एक आदर्श माणक म्हणून मान्यता असलेलं आहे. त्याद्वारे मग आपण खरेदी करणाऱ्या दगिन्यांत अशा मौल्यवान धातूंचे किती प्रमाण आहे हे त्याद्वारे अचूक सांगितले जाते. HUID अर्थात हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन. हा सहा अंकी अल्फान्यूमरीक कोड असतो. अल्फान्यूमरीक यातच त्याचा अर्थ दडलेला आहे.. म्हणजेच अल्फबेट्स अर्थात अक्षरे आणि नंबर मिळून बनलेला असा हा कोड. HUID ची अशी ही नवीन यंत्रणा भारत सरकारने १ जुलै २०२१ ला सर्वप्रथम वापरात आणली. त्याद्वारे सोन्याच्या प्रत्येक दागिन्याला किंवा त्याच्या खरेदी- विक्री केल्या जाणाऱ्या प्रत्येक तुकड्याला हा HUID बंधनकारक असेल.