Ep- 03. म्हारी छोरी छोरों से कम हैं के | प्रतीक्षा बागडी - पहिली महिला महाराष्ट्र केसरी| Pratiksha Bagdi

विषय खोल पृथ्वी गोल - Vishay Khol Pruthvi Gol

May 6 2023 • 3 mins

#vishaykholpruthvigol #pratikshabagdi #maharashtrkesri #wrestling तिनं लहानपणी पाहिला होता मेरी कोमचा पिक्चर आणि बापाला म्हणाली होती की तिला पण मोठं होऊन मेरी कोम सारखं बॉक्सर व्हायचंय! पण ज्यावेळी पोरीचा बापच गडी रांगडा पैलवान असंल ना तर तो म्हणल, म्हारी छोरिया छोरोंसे कम है के? पोरगीला घातलं त्यानं आखाड्यात आणि शिकवले एकापेक्षा एक डाव! आणि काढलं ना राव पोरीनं बापाचं नाव! नाव प्रतीक्षा रामदास बागडी, राहणार तुंग जिल्हा सांगली! पहिल्या महिला महाराष्ट्र केसरीची गदा उचलत तिने इतिहास रचून विषय खोल आणि पृथ्वी गोल केलीय! महाराष्ट्र केसरी स्पर्धा सुरू होऊन बरीच दशके उलटली पण आजवर महिलांची महाराष्ट्र केसरी कधी झालीच नाही. मग अनेक लोकांच्या प्रयत्नांना अखेरीस यश येऊन या वर्षी पहिली महिला महाराष्ट्र केसरी पार पडली तीही सांगली जिल्ह्यात आणि सांगायची गंमत म्हणजे पहिली महाराष्ट्र केसरी झाली तीही सांगलीचीच! अंतिम सामना रंगला तो प्रतीक्षा आणि तिचीच जिवलग मैत्रीण वैष्णवी पाटील हिच्यात. पहिल्या चार मिनिटांत ४-४ असा बरोबरीत असणारा कुस्तीचा डाव तिने अखेरच्या क्षणी जिंकत महाराष्ट्र केसरीची मानाची गदा उचलली.