PODCAST

कीर्तन विश्व पॉडकास्ट (Kirtan Vishwa Podcast)

Kirtan Vishwa

कीर्तन प्रवचन ही महाराष्ट्रातील आणि देशातील एक अतिशय समृद्ध परंपरा आहे. भारतीय सांस्कृतिक, धार्मिक आणि आध्यात्मिक जीवन समृद्ध होण्यासाठी कीर्तन परंपरेने फार मोठा हातभार लावलेला आहे.  गेली शेकडो वर्षे अनेक पिढ्यांचे सांस्कृतिक, भावनिक आणि मानसिक पोषण करण्याचे काम हजारो कीर्तनकारांनी केलेले आहे आणि आजही करीत आहेत.
कीर्तन हे देव, देश आणि धर्म यांचा प्रचार प्रसार करण्याचे, युवापिढीवर संस्कार करण्याचे अतिशय उत्तम माध्यम आहे. कीर्तन ही मनोरंजनाबरोबरच संगीत, नृत्य, साहित्य, कला, इतिहास, संस्कृती परंपरा  यांचीही ओळख आपल्याला करून देतात. मानवी जीवनाला वळण लावण्याचे एक विलक्षण सामर्थ्य कीर्तनकलेमध्ये आहे. विशेषत: तरूण पिढीमध्ये कीर्तनाविषयी आवड आणि जाण रूजविता येईल यासाठी विविध प्रकारच्या कीर्तनांचे पॉडकास्ट प्रदर्शित करण्यात येतील. यामध्ये नारदीय कीर्तन, राष्ट्रीय कीर्तन, वारकरी कीर्तन, तुकडोजी महाराज संप्रदाय कीर्तन, रामदासी संप्रदाय कीर्तन, हरिकथा कीर्तन, दासगणू महाराज संप्रदाय कीर्तन, वैज्ञानिक किर्तन, अन्य संप्रदाय कीर्तन प्रकारांचे सादरीकरण करण्यात येईल.

Kirtan Pravachan is a very rich tradition in Maharashtra and the country. The kirtan tradition has contributed immensely to the enrichment of Indian cultural, religious and spiritual life. Over the last hundreds of years, thousands of kirtankars have worked to nurture the cultural, emotional and mental well-being of many generations.
Kirtan is a great way to spread the message of God, country and religion, to educate the youth. Apart from entertainment, kirtan also introduces us to music, dance, literature, art, history, culture and traditions. Kirtan has an extraordinary power to turn human life around. Podcasts of various types of kirtans will be presented to inculcate love and awareness about kirtan, especially among the younger generation. In this Naradiya Kirtan, Rashtriya Kirtan, Warkari Kirtan, Tukdoji Maharaj Sampraday Kirtan, Ramdasi Sampraday Kirtan, Harikatha Kirtan, Dasganu Maharaj Sampraday Kirtan, Scientific Kirtan, other Sampraday Kirtan types will be presented.


Play Trailer
Trailer
Aug 17 2021
56 seconds
संतांचा प्रसाद । ह.भ.प. जयवंत महाराज बोधलेधन्य काळ संतभेटी । ह.भ.प. जयवंत महाराज बोधलेसंतभेटीने झालो पोटी शीतळ । ह.भ.प. जयवंत महाराज बोधले
धन्य काळ संतभेटी । पायी मिठी पडली तो ॥ प्रत्येक मनुष्यमात्राच्या जीवनातील सर्वात धन्यता असणारा काळ कोणता ? जर जेव्हा संतांची भेट होते, तो काळ धन्य. कारण ती भेट आपल्याला अमूलाग्र बदलून टाकते. प्रपंचामध्ये एखादी वस्तू प्राप्त झाली तर इच्छा वाढतात पण परमार्थातील वस्तू मिळाली की इच्छा संपून जातात असे गोड चिंतन या कीर्तनात आहे. अधिक (महान कृष्णभक्त) श्री संत सूरदास यांच्या चरित्रातील एक दृष्टान्त मोठ्या भक्ती भावाने रंगविलेला आहे.   कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा. https://www.youtube.com/c/KirtanVishwa कीर्तनविश्व प्रकल्पाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी किंवा आर्थिक सहयोग देण्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या https://www.kirtanvishwa.org
Nov 19 2021
54 mins
मुलांवर चांगले संस्कार आणि श्रीमद आद्य शंकराचार्य जन्म कथा । ह.भ.प. विवेकबुवा गोखले
Nov 15 2021
1 hr 1 min
सदा संतांपाशी जावे । ह.भ.प. विवेकबुवा गोखलेगप्पा हरिदासांशी । ह.भ.प. प्रभंजन भगत यांची मुलाखतभगवंताकडून काय मागावे ? । ह.भ.प. विवेकबुवा गोखले
सहसा कुणी परमार्थाकडे वळत नाही, वळले तर साधना जमत नाही, जमली तरी देव प्रसन्न होतीलच याची खात्री नाही. आणि भगवंत प्रसन्न झाले तर काय मागावे ? देवाकडे काय मागावे ? हे भक्ताला कळेलच असे नाही अशा भक्तांना मार्गदर्शन करण्यासाठी संतांनी काही अभंगांची रचना केली आहे. त्या आधारे विवेचन पूर्वरंगात केले आहे. आख्यानामध्ये "विष्णुदत्त ब्राह्मणाची" कथा सांगितली आहे. दत्त माहात्म्य या ग्रंथाआधारे आलेली ही कथा म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या मातापित्यांच्या पूर्वजन्माची कथा आहे. कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा. https://www.youtube.com/c/KirtanVishwa कीर्तनविश्व प्रकल्पाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी किंवा आर्थिक सहयोग देण्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या https://www.kirtanvishwa.org
Nov 1 2021
1 hr 9 mins
दासगणू महाराजांवर साई-अनुग्रह । ह.भ.प. प्रभंजन भगत
Oct 29 2021
1 hr 2 mins
काशीराम शिंपी यांच्यावर साईकृपा । ह.भ.प. प्रभंजन भगत
श्री नामदेव महाराजांचा प्रसिद्ध अभंग "आकल्प आयुष्य व्हावे तया कुळा । माझिया सकळा हरिच्या दासा ॥" असा आहे. या अभंगावरील निरुपणात संतांच्या कृपेचे मोठेपण वर्णिले आहे. संत परीक्षा कठोर घेतात पण उत्तीर्ण शिष्यावर कृपा देखील तेव्हढीच भव्य स्वरुपाची करतात. यावर चिंतन या कीर्तनामध्ये मांडले आहे. आख्यानामध्ये श्रीसाईनाथांनी काशीराम शिंप्यावर परीक्षा घेऊन अंती कृपा कशी केली हा प्रसंग मोठा रंगतदार पणे सादर केलेला आहे. कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा. https://www.youtube.com/c/KirtanVishwa कीर्तनविश्व प्रकल्पाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी किंवा आर्थिक सहयोग देण्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या https://www.kirtanvishwa.org
Oct 25 2021
1 hr 3 mins
साईनाथ अवतरण । ह.भ.प. प्रभंजन भगतचिलाजी पाटील यांवर कृपा । रामदासी कीर्तन । ह.भ.प. राघवेंद्र देशपांडे
प्रवासामध्ये आपण कोणत्या गाडीची संगत कातो त्याच्यावरुन आपण कधी पोचणार ते ठरते. तसेच भक्तिमार्गात सत संगती कसा लाभ देते याचे निरुपण या कीर्तनात आहे. श्री समर्थ रामदासस्वामी महाराजांनी चिलाजी पाटील यांवर कशी कृपा केली हे सांप्रदायिक आख्यान सांगितले आहे. चार दाणे दान करण्यासाठी कंजुषी करु नये अन्यथा संकट ओढवू शकते, हा उपदेश या कथेत आहे. तसेच कुणी काही चूक केली तर त्याला लगेच शिक्षा न करता त्याला क्षमा केल्याने एखादे वेळी त्या व्यक्तीचे उत्तम तऱ्हेने मनपरिवर्तन होते असा बोध या कथेत आहे.    कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा. https://www.youtube.com/c/KirtanVishwa कीर्तनविश्व प्रकल्पाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी किंवा आर्थिक सहयोग देण्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या https://www.kirtanvishwa.org
Oct 18 2021
1 hr 6 mins
रंगनाथस्वामी आणि रामदास स्वामी भेट । ह.भ.प. राघवेंद्र देशपांडे
Oct 15 2021
1 hr 1 min
कल्याण भक्ताची परीक्षा (ब्रह्मपिसा)। ह.भ.प. राघवेंद्र देशपांडे
प्रत्येक मनुष्याला हा अनुभव आहे की कोणतीही गोष्ट मिळवण्यासाठी काही साधन करावे लागते. अकरावी मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी दहावीची परीक्षा उत्तीर्ण होणे हे साधन करावे लागते. व त्यासाठी अनेकांचे मार्गदर्शन घ्यावे लागते. तसेच परमार्थ साधण्यासाठी सुद्धा साधन करावे लागते. कष्ट घ्यावे लागतात. मार्गदर्शन घ्यावे लागते. परमार्थासाठी कसे सायास करावे ? कुणाचे मार्गदर्शन घ्यावे ? त्यासंबंधी मार्गदर्शन या कीर्तनात केले आहे आणि समर्थ रामदासस्वामी यांनी त्यांच्या "कल्याण" नावाच्या भक्ताचे, कशी परीक्षा घेतली ? याची कथा देखील रसाळपणे गायिली आहे.   कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा. https://www.youtube.com/c/KirtanVishwa कीर्तनविश्व प्रकल्पाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी किंवा आर्थिक सहयोग देण्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या https://www.kirtanvishwa.org
Oct 11 2021
57 mins
श्रीहनुमान जन्म कथा | ह.भ.प. चारुदत्त आफळे
रंपरेने, रामभक्त श्रीहनुमान हे शक्ती, बुद्धिमत्ता, शिक्षण, शौर्य आणि निर्भयता यांचे प्रतीक मानले जातात. संकटात फक्त हनुमानजींची आठवण येते. त्यांना संकटमोचन म्हणतात. हनुमानास सर्व देवतांनी आशीर्वाद दिला. ते एक दास आणि राजदूत, रणनीतिकार, विद्वान, संरक्षक, वक्ता, गायक, नर्तक, बलवान आणि बुद्धिमान देखील होते. श्रीहनुमान जयंती निमित्त कीर्तनविश्व श्रीहनुमान जन्म कथा सादर करीत आहे. ही हनुमान कथा ऐका राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांच्या गोड वाणीतून...    कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा. https://www.youtube.com/c/KirtanVishwa कीर्तनविश्व प्रकल्पाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी किंवा आर्थिक सहयोग देण्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या https://www.kirtanvishwa.org
Oct 8 2021
1 hr 19 mins
ह.भ.प. मोहनबुवा कुबेर यांची मुलाखत । गप्पा हरिदासांशीरामभक्त भरत परिक्षा । ह.भ.प. मोहनबुवा कुबेर
श्री मोहनबुवा कुबेर यांची कीर्तने म्हणजे नारदीय कीर्तन पद्धतीचा वस्तुपाठ आहेत. तीन कीर्तनांसाठी तीन वेगवेगळे अभंग निरुपणासाठी घेतलेले आहेत. परमार्थ मार्गातील अनेक संकल्पना स्पष्ट केल्या आहेत. दीन म्हणजे दुबळा नव्हे तर, जो पाशातून सुटण्याची धडपड करतो तो अध्यात्मदृष्ट्या दीन. अशांचा उद्धार भगवंत करतातच हा विश्वास दृढ व्हावा, अशी तीन चरित्रे भावोत्कट रीतीने सादर केली आहेत. केवट चरित्रात या केवटाच्या पूर्वजन्माची कथा आहे. तसेच शबरी कथा व भरत कथा यांमधील पदे आणि तपशील, आपण ऐकलेल्या कथांपेक्षा खूप वेगळे आहेत.  कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा. https://www.youtube.com/c/KirtanVishwa कीर्तनविश्व प्रकल्पाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी किंवा आर्थिक सहयोग देण्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या https://www.kirtanvishwa.org
Sep 24 2021
1 hr 6 mins
रामभक्त शबरी चरित्र । ह.भ.प. मोहनबुवा कुबेर
रामभक्त शबरी चरित्र । ह.भ.प. मोहनबुवा कुबेर श्रीरामभक्त चरित्र सप्ताह श्री मोहनबुवा कुबेर यांची कीर्तने म्हणजे नारदीय कीर्तन पद्धतीचा वस्तुपाठ आहेत. तीन कीर्तनांसाठी तीन वेगवेगळे अभंग निरुपणासाठी घेतलेले आहेत. परमार्थ मार्गातील अनेक संकल्पना स्पष्ट केल्या आहेत. दीन म्हणजे दुबळा नव्हे तर, जो पाशातून सुटण्याची धडपड करतो तो अध्यात्मदृष्ट्या दीन. अशांचा उद्धार भगवंत करतातच हा विश्वास दृढ व्हावा, अशी तीन चरित्रे भावोत्कट रीतीने सादर केली आहेत. केवट चरित्रात या केवटाच्या पूर्वजन्माची कथा आहे. तसेच शबरी कथा व भरत कथा यांमधील पदे आणि तपशील, आपण ऐकलेल्या कथांपेक्षा खूप वेगळे आहेत. कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा. https://www.youtube.com/c/KirtanVishwa कीर्तनविश्व प्रकल्पाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी किंवा आर्थिक सहयोग देण्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या https://www.kirtanvishwa.org
Sep 20 2021
1 hr 9 mins
गणेश माहात्म्य भाग २ । ह.भ.प. महेशबुवा काणे
गणेश माहात्म्य भाग २ मोरयाची कृपा । Ganesh Chaturthi । ह.भ.प. महेशबुवा काणे "दे चरणांचा संग - मोरया दे चरणांचा संग ! जप तप साधन काही न घडले होतो मीही अपंग, मोरया " खरंच, पंगुता म्हणजे काय? तर सर्व इंद्रिये जागच्या जागी आहेत. पण काम करत नाहीत. ती अवस्था म्हणजे पंगुता. कान आहेत पण ऐकू येत नाही. डोळे आहेत पण नीटसे दिसत नाही. नाक हात पाय जसे हवे तसे कार्य करीत नाही त्याला पंगुता म्हणतात. परमार्थातही नियम तोच. कान असून कीर्तन ऐकत नाही. डोळे असून देवाला पाहत नाही. मुख आहे पण भजन गात नाही. हाताने अन्नदान होत नाही. पायाने यात्रा होत नाही. ती सारी पंगुता. ही पंगुता जावी व मोरयाची कृपा मिळावी अशी प्रार्थना करणारा हा अभंग आहे. या अभंगाच्या निरूपणानंतर श्री गणेशाने कंदर्पासुराचा वध कसा केला ती मधुर कथा सांगितली आहे. ऐकू या हरिभक्त परायण महेश बुवा काणे यांचे सुमधुर कीर्तन !    कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा. https://www.youtube.com/c/KirtanVishwa कीर्तनविश्व प्रकल्पाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी किंवा आर्थिक सहयोग देण्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या https://www.kirtanvishwa.org
Sep 17 2021
1 hr 7 mins
गणेश माहात्म्य भाग १ । ह.भ.प. महेश बुवा काणे
गणेश माहात्म्य भाग १ दुर्वादेवी कथा । Ganesh Chatrurthi । ह.भ.प. महेश बुवा काणे या गणेश उत्सवाच्या निमित्ताने या सप्ताहातील तिन्ही कीर्तने आपण गणेश महात्म्यावर ऐकणार आहोत. भगवान श्री गणेशाचे परमभक्त - श्री. मुदगल ऋषी. या ऋषींनी गणेशाचे दर्शन-अनुभूती प्राप्त केली व मुदगल पुराणाची रचना केली. या पुराणात भगवान गणेशाच्या अवतारलीलांमधील अनेक दैवी लीलांचे वर्णन आले आहे. त्यातील काही कथांचा आपण या सप्ताहात आनंद घेणार आहोत हरिभक्त परायण श्री. महेषबुवा काणे यांच्या नारदीय कीर्तनामधून. बुवांनी निरुपणासाठी श्री गोसावीनंदन यांचा अभंग घेतला आहे. "देव गजानन ध्यायी | ज्या सी पाहता भवश्रम गेला ते सुख बोलू काही | प्राण्या देव गजानन ध्यायी |" या गजाननाच्या कृपेने भवश्रम कसा गेला, या निरुपणाबरोबरच गणेशाला प्रिय असणारी जी दुर्वावनस्पती ; त्या दुर्वा देवीची कथा उत्तररंगात सांगितली आहे. ऐकुया महेशबुवा काणे यांचे गणेश महात्म्यावरील सुमधुर नारदीय कीर्तन !     कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा. https://www.youtube.com/c/KirtanVishwa कीर्तनविश्व प्रकल्पाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी किंवा आर्थिक सहयोग देण्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या https://www.kirtanvishwa.org
Sep 13 2021
1 hr 9 mins
श्री गणेश जन्म कथा । ह.भ.प. चारुदत्तबुवा आफळे

0:00